कारवाई सुरू होताच सुप्यातील बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:25+5:302021-05-10T04:20:25+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे प्रशासनाने कारवाई सुरू करताच भाजीबाजार बंद झाला आहे, तसेच गेल्या काही दिवसांत येथील ...

The market in Supa is closed as soon as the action starts | कारवाई सुरू होताच सुप्यातील बाजार बंद

कारवाई सुरू होताच सुप्यातील बाजार बंद

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथे प्रशासनाने कारवाई सुरू करताच भाजीबाजार बंद झाला आहे, तसेच गेल्या काही दिवसांत येथील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे.

कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत पातळीवर प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. ग्रामस्थांनी घालून दिलेल्या नियमांचे जबाबदारीने पालन केले, तर कोरोनाच्या प्रसाराचा वेग नियंत्रणात येऊन कोरोनापासून मुक्ती मिळू शकते. सुप्यातील पारनेर रोड, बाजारतळ चौक ते शहजापूर चौकापर्यंत भाजी विक्रेते थांबल्याने त्यांच्याभोवती वाढलेल्या गर्दीतून सुप्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. एकाच दिवशी ४६ वर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचल्याने उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी सूचना देऊनही विक्रेते दाद देत नव्हते. शेवटी विक्रेत्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगताच त्यांनी काढता पाय घेतला व खरेदीसाठी आलेली मंडळी घराचा रस्ता जवळ करून तेथून निघून गेली. अशी कारवाई सुरू असल्याने गावातील गर्दी कमी झाली अन‌् रुग्णसंख्येत घट सुरू झाली. शनिवार पॉझिटिव्ह रुग्णसंख्या चौदावर आली. शुक्रवारी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे ग्रामविस्तार अधिकारी नागवडे यांनी सांगितले. एका जागेवर थांबून भाजीपाला विक्री करण्यास बंदी असून शेतकरी, विक्रेते फेरीवाले यांना घरोघरी जाऊन सर्व नियमांचे पालन करूनच भाजीपाला, शेतमाल विकण्यासाठी परवानगी आहे, असे त्यांनी सांगितले.

----

०९ सुपा कारवाई

वारंवार सूचना देऊनही दखल घेत नसल्याने सुपा येथे भाजीपाला विक्रेत्यांचा वजन- काटा कारवाईवेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला.

Web Title: The market in Supa is closed as soon as the action starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.