तेराव्या वर्षी लावले मुलीचे लग्न; सासरी झाला अतोनात छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:56+5:302021-09-16T04:27:56+5:30

तालुक्यातील एका गावातील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न लावून देण्यात आले. सासरी गेल्यानंतर पतीने तिच्या ...

The marriage of a daughter planted in the thirteenth year; The father-in-law was severely tortured | तेराव्या वर्षी लावले मुलीचे लग्न; सासरी झाला अतोनात छळ

तेराव्या वर्षी लावले मुलीचे लग्न; सासरी झाला अतोनात छळ

तालुक्यातील एका गावातील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न लावून देण्यात आले. सासरी गेल्यानंतर पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच घरकाम येत नाही म्हणून पती, सासू-सासरा मुलीस सतत शिवीगाळ करून मारहाण करत होते. तसेच मुलीस बाहेरची बाधा झाली आहे, असा समज करून घेत तिला राहुरी तालुक्यातील एक भोंदूबाबा व नेवासा तालुक्यातील आणखी एका भोंदूबाबाकडे घेऊन गेले. त्या भोंदूबाबाने या मुलीचा हात पिरगळून तिला मारहाण केली. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी सदर मुलीच्या पतीने तिला माहेरी काढून दिले. आईने मुलीला तिच्या आजोबाकडे पाठविले. मुलीने सर्व प्रकार आजोबास सांगितला. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंध अधिनियम, नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The marriage of a daughter planted in the thirteenth year; The father-in-law was severely tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.