लग्नाचा मोका... मंगळसूत्राला धोका

By Admin | Published: May 19, 2014 11:20 PM2014-05-19T23:20:10+5:302014-05-20T00:08:24+5:30

अहमदनगर : सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. लग्नासाठी मंगल कार्यालयात जाणार्‍या व मंगल कार्यालयातून घरी येणार्‍या महिलांच्या गळ््यातील मंगळसूत्रावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे.

Marriage Mocus ... Mangrol Risk | लग्नाचा मोका... मंगळसूत्राला धोका

लग्नाचा मोका... मंगळसूत्राला धोका

अहमदनगर : सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. लग्नासाठी मंगल कार्यालयात जाणार्‍या व मंगल कार्यालयातून घरी येणार्‍या महिलांच्या गळ््यातील मंगळसूत्रावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली आहे. चालू आठवड्यामध्ये तीन-चार महिलांचे मंगळसूत्र चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये चोरट्यांची दहशत पसरली आहे. मे महिन्यामध्ये लग्नसराई धूमधडाक्यात आहे. सलग विवाह मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाली आहेत. एक मे पासून सलग लग्नतिथी आहेत. लग्नासाठी जाणार्‍या महिलांचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सावेडी परिसरात सर्वाधिक मंगल कार्यालये आहेत. रिक्षा, एस.टी. बस, दुचाकीवरून उतरून महिला मंगल कार्यालयाकडे जातात. या मंगल कार्यालयाच्या परिसरात चोरटे दबा धरून बसतात. महिला मंगल कार्यालयाच्या बाहेर पडताच किंवा मंगल कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर चोरटे पाळत ठेवत आहेत. त्यामुळे मंगळसूत्र चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सावेडी भागातून आता दिवसाआड मंगळसूत्र चोरीला जात आहेत. पोलिसांची गस्त नसल्याने चोरट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे महिलाही भयभीत झाल्या आहेत. बीट मार्शलसाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. नातेवाईकांच्या लग्नासाठी पोलीस कर्मचारीही सुट्टीवर आहेत. त्यामुळे गस्त घालण्यासाठीही पोलीस बळ अपुरे पडत आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर चोर्‍या वाढल्या आहेत. दुचाकी, मोटारसायकल, घरातील साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी) पवारांकडून दखल सावेडी परिसरामध्ये घरफोड्या, दुचाकी चोर्‍या, मंगळसूत्र चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यामध्ये तोफखाना हद्दीतील तपासाचे प्रमाण शून्यावर आहे. एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या एकाही घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात आला नसल्याचे क्राईम बैठकीत स्पष्ट झाले. एप्रिल महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार, नेत्यांच्या सभा, मतदान यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे तपासासाठी पोलिसांना वेळ मिळाला नाही. याशिवाय एप्रिलमध्ये विविध जयंत्यांच्या मिरणुकाही असल्याने पोलिसांना बंदोबस्तात व्यस्त राहावे लागले होते.

Web Title: Marriage Mocus ... Mangrol Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.