कोतूळ पुलाचे मेरी नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:45+5:302021-01-09T04:16:45+5:30
गेल्या पाच वर्षांपासून जनरेट्याच्या जोरावर राजकीय वरदहस्ताशिवाय गावातील जनतेने वर्गणी काढून कोतूळ पुलाचा निधी सामान्य जनतेने पदरात पाडून घेतला. ...
गेल्या पाच वर्षांपासून जनरेट्याच्या जोरावर राजकीय वरदहस्ताशिवाय गावातील जनतेने वर्गणी काढून कोतूळ पुलाचा निधी सामान्य जनतेने पदरात पाडून घेतला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात उद्घाटन मुहूर्त ठरला. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने हे उद्घाटन झाले नाही. मोठमोठे उड्डाणपूल व छोट्या कामांची ऑनलाइन उद्घाटने झाली. मात्र, कोतूळ पूल मेरीमुळे अडला असल्याचे अधिकारी सांगतात.
कोतूळ पुलाचे २० कोटी रुपयांचे सी टेंडर असल्याने कंत्राटदाराला मूळ आराखड्यात मेरी व मुख्य अभियंता जलसंपदा यांच्या परवानगीने बदल करता येत असल्याने कोतूळ पुलाच्या आराखड्यात आता नवीन बदलाची परवानगी मेरी कडे ठेकेदारने मागितली आहे. उत्तर महाराष्ट्र जलसंपदाचे मुख्य अभियंता यांनी परवानगी दिल्यास हे काम त्वरित सुरू होईल.
.....................
पुलाच्या नवीन सुधारित आराखड्यामुळे कामाचा उरक जलद होईल. मुख्य अभियंता यांच्याकडून लवकरच परवानगी मिळणार आहे. लवकरच काम सुरू होईल.
- संदीप देशमुख, उप अभियंता, जलसंपदा, संगमनेर
..................
असा होता मूळ आराखडा
एकूण पुलाची लांबी २६२ मीटर
४२.५ मीटरचे एकूण सहा गाळे
ट्राफिक ट्रॅक व पदचारी पट्ट्यासह ९ मीटर रुंदी
नवीन आराखडा
एकूण लांबी २५५ मीटर
२६ मीटरचे १० गाळे
रुंदी पूर्वी प्रमाणेच