कोरोनाचा संदेश देण्यासाठी पुतळ्यालाही घातला मास्क..! संगमनेरातील पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:58 PM2020-06-08T12:58:07+5:302020-06-08T13:03:24+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. या मास्क घातलेल्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
संगमनेर : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील अकोले बायपासवरील एका पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने मास्क घातला आहे. यातून पुतळ्याने मास्क घातला..तुम्हीही घाला.. असा संदेश या व्यक्तीने देण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. या मास्क घातलेल्या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
अकोले बायपासला तीन ते चार महिन्यापूर्वी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने रस्ता सुशोभिकरणासाठी खासगी संस्थांना, कंपन्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एका औषध कंपनीने संगमनेर शहरातील अकोले बायपास रोडवरील एका चौकात सूर्यनमस्कार घालताना एक पुतळा बसविला आहे.
याच पुतळ्याला एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क’ घातला आहे. असा संदेश फोटोसह सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोची संगमनेरात चांगलीच चर्चा होत आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकही सोशल डिस्टन्स पाळत आहेत. परंतु या अज्ञाताने या पुतळ्याला मास्क घालून कोरोना रोखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे, अशी चर्चा या सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटोवर सुरू आहे.