अळकुटी, जामखेडमध्ये सामूहिक विवाह
By Admin | Published: May 18, 2014 11:30 PM2014-05-18T23:30:14+5:302024-04-05T13:18:09+5:30
पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली.
पारनेर : खंडेश्वर मित्र मंडळ व अळकुटी ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात एकोणीस जोडपी विवाहबध्द झाली. मंगलमय वातावरण व हजारो वºहाडींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला. अळकुटी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेश्वर मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने गुरूवारी दुपारी अळकुटी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. मंडपातच साखरपुडा, हळद व इतर सामूहिक विधी झाल्यानंतर वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी गोरज मुहुर्तावर एकोणीस जोडप्यांचे विवाह झाले. यावेळी आमदार विजय औटी, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाळे, संतोष काटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठुबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान शिंदे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी) सामूहिक विवाहनिमित्त रक्तदान शिबिर जामखेड : शेतकरी, व्यापारी समाजसेवी संस्थेच्यावतीने येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जण विवाहबध्द झाले. २१ सर्वधर्मीय समाज व दाम्पत्यांचा त्यांच्या धार्मिक पध्दतीने विवाह करण्यात आले. जामखेड बाजार समितीचे माजी सभापती गोरख शिंदे, खर्डा येथील रामचंद्र इंगोले, मोहोळ जि. सोलापूर येथील बोडके, सूर्यकांत भोईटे यांनी वधू-वरांना शुभार्शिवाद दिले. गेल्या तीन वर्षापासून संतोष पवार सामूहिक विवाहाचा उपक्रम राबवित आहेत. शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडणार्या मासिकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शंभर जणांनी रक्तदान केले. (तालुका प्रतिनिधी)