श्रीगोंद्यात महिला आरोपीची कोठडीत प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:33 PM2018-06-26T16:33:26+5:302018-06-26T16:46:18+5:30
भिंगाण येथील वैभव पारखे या चिमुकल्याच्या खून प्रकरणातील आरोपी काजल शांतीलाल पारखे हिची न्यायालयीन कोठडीत प्रसुती झाली.
श्रीगोंदा : भिंगाण येथील वैभव पारखे या चिमुकल्याच्या खून प्रकरणातील आरोपी काजल शांतीलाल पारखे हिची न्यायालयीन कोठडीत प्रसुती झाली. न्यायालयीन कोठडीत असताना काजलला प्रसुतीपूर्व वेदना होऊ लागल्या. त्यानंतर लगेच ग्रामीण रुग्णालयात तिला हलविण्यात आले. रुग्णालयात नेताच तिने मुलाला जन्म दिला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, भिंगाण येथील वैभव पारखे या सात वर्षांच्या मुलाचा खुन झाला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी वैभव (दीर) यांच्या खून प्रकरणी काजल पारखे (भावजयी) हीला अटक केली होती. काजलला अटक करण्यापुर्वी ती गर्भवती होती. श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस पोलिस दरमहा काजलचे ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करत असत. परंतु काजलने आठवण्याच महिन्यात तिने मुलाला जन्म दिला. काजलला आठ दिवसानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. पोलिस कोठडीत असताना आज दिला प्रसूतीपुर्व वेदनांचा त्रास होऊ लागला पण काजलने पोलिस कोठडीतून बाहेर काढले. काजलची श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुखरुपाने झाली. मुलाचे वजन कमी आहे पण आई सुखरुप आहे.
पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक निलेश कांबळे, महावीर जाधव हे ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीवेळी उपस्थित होते. पोलीसांनी कोठडीत असताना काजलची काळजी घेऊन माणुसकीचा धर्म पाळला.