मायगाव देवी ग्रामपंचायत रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:24+5:302021-09-15T04:25:24+5:30
सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्यसेवक यांना मुख्यालय सोडू नये, असे आदेशित केल्यानंतरही मायगाव देवीचे ...
सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्यसेवक यांना मुख्यालय सोडू नये, असे आदेशित केल्यानंतरही मायगाव देवीचे ग्रामसेवक नियमित हजर राहत नसून विकासकामांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घरोघरी शौचालय व्हावे म्हणून ग्रामसेवकाकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. शिवाय शौचालय बांधावे, गावात स्वच्छता ठेवावी, कोरोनापासून कसे संरक्षण करावे याबाबत ग्रामसेवकाकडून कोणतेही मार्गदर्शन केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बी.ओ. पाटील हे गावचे ग्रामसेवक म्हणून काम पाहत असतात. पण ते नियमित कार्यालयात उपस्थित नसतात. गावात कोरोना किंवा इतर रोगराई होऊ नये म्हणून कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. जनजागृती करीत नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
.............
एक महिन्यापासून ग्रामसेवक गावात आले नाही. ते नियमित येत नाहीत. मुख्यालयात हजर राहत नाही. कोरोना संसर्ग दूर व्हावा, गावात स्वच्छता राहावी म्हणून कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. ते हजर राहत नसल्याने विकासकामांचा खोळंबा झाला आहे.
- राजेंद्र नाजगड, कोपरगाव तालुकाप्रमुख, शिवसेना
..............
मी सध्या तलाठी ऑफिसला काम असल्याने आलो आहे. उद्या मायगाव देवीला येणार आहे.
- बी.ओ. पाटील, ग्रामसेवक, मायगाव देवी, ता. कोपरगाव