महापौर पदाचा घोडेबाजार : बसपाचा भाजपला पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:05 PM2018-12-26T17:05:36+5:302018-12-26T17:06:27+5:30
अहमदनगर महापालिकेत भाजपाचा महापौर करण्यासाठी बसपा पुढे सरसावले आहे. महापौर निवडणुकीत भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना मत देण्याचा पक्षादेश बजावण्यात आला आहे.
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत भाजपाचा महापौर करण्यासाठी बसपा पुढे सरसावले आहे. महापौर निवडणुकीत भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना मत देण्याचा पक्षादेश बजावण्यात आला आहे.
महापालिका महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी २८ डिसेंबरला होणार आहे. महापौर पदासाठी भाजपाचे बाबासाहेब वाकळे याना मतदान करण्याचा व्हीप बहुजन समाज पक्षाचे गटनेते मुदस्सर शेख यांनी काढला आहे. स्वत: व अन्य ३ नगरसेवकांना त्यांनी व्हीप बजावला आहे. मुदस्सर शेख, अश्विनी जाधव, अनिता पंजाबी व अक्षय उनवने अशा चौघा नगरसेवकांनी वाकळे यांनाच मतदान करण्याचा व्हीप मंगळवारी काढला आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक अजून एकही अधिकृत उमेदवारी दाखल नाही, तरी व्हीप जारी करण्यात आला आहे.