खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मयुरेश्वरी प्रतिष्ठानचा संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:04 AM2021-01-08T05:04:14+5:302021-01-08T05:04:14+5:30
कोपरगाव : कोपरगाव येथील संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांच्यावतीने खिर्डी गणेश येथे राज्यस्तरीय पातळीवरील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे ...
कोपरगाव : कोपरगाव येथील संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांच्यावतीने खिर्डी गणेश येथे राज्यस्तरीय पातळीवरील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे चषक अंतर्गत खुल्या टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात शिंगणापूरच्या मयुरेश्वरी प्रतिष्ठानने विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, कृषितज्ज्ञ सुरेश कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी विजेत्या संघांना रोख बक्षिसे, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुमित कोल्हे, खिर्डी गणेशचे उपसरपंच चंद्रकांत चांदर, शिंगणापूरचे सरपंच भिमा संवत्सरकर उपस्थित होते. सदर स्पर्धांसाठी राज्यभरातून ६० संघातील ७५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पाच दिवसात एकूण ५१ सामने खेळले गेले. यावेळी नितीन कोल्हे, सुमित कोल्हे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
या सामन्यामध्ये अंतिम सामन्यात मयुरेश्वरी प्रतिष्ठान (शिंगणापूर) संघाने प्रथम क्रमांकाचे ३१ हजारांचे बक्षीस व चषक मिळविले. फ्रेंडस् क्लबने (कोपरगाव) उपविजेतेपद मिळविले. या संघाने २१ हजारांचे रोख बक्षीस मिळविले. निफाड तालुक्यातील खेडले झुंगे येथील साई गोविंद संघाने ११ हजारांचे तिसरे बक्षीस जिंकले. एस. के. इलेव्हन (कोपरगाव) संघ हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाने ७००१चे बक्षीस मिळविले.
...............
फोटो०४-शिंगणापूरच्या मयुरेश्वरी प्रतिष्ठानने विजेतेपद पटकावले. संघाला पारितोषिक देताना संजीवनीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, सुरेश कोल्हे आदी उपस्थित होते.