मापात पाप; २६ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:34 AM2019-05-05T11:34:09+5:302019-05-05T11:35:06+5:30
: वजन मापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तंंूची विक्री करताना मापात पाप करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांंवर वैध मापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करत त्यांना २६ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़
अहमदनगर : वजन मापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तंंूची विक्री करताना मापात पाप करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांंवर वैध मापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करत त्यांना २६ लाख ५८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़
कारवाई झालेल्यांमध्ये ४४३ वजनमापाचे प्रकरणे असून, १७० कारवाई या पॅकबंद वस्तूच्या विक्रीसंदर्भातील आहेत़ वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल देणे, नादुरुस्त वजनमाप वापरणे, वजनमापाची पडताळणी करून न घेणे आदी बाबी आढळून आल्या आहेत़
दुकानातून पॅकबंद वस्तूंची विक्री करताना किमतीत खाडाखोड करणे, मालाच्या वजनापेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे अशी १७० प्रकरणे वैध मापन विभागाला तपासणी मोहिमेत आढळून आली आहेत़ या विक्रेत्यांवर वैद्यमापन शास्त्र अधिनियम २००९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर सहा जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़
न्यायालयात निकाल होऊन त्यांना १७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ वैध मापन शास्त्र
विभागाच्या धडक कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वर्षभरात अवघ्या १४ तक्रारी
वैध मापनशास्त्र विभागाविषयी शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना विशेष माहिती नाही़ वजनमापासंदर्भात या विभागाकडे मागील वर्षभरात अवघ्या १४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ बहुतांशी ठिकाणी वजनात फसवणूक झाली तरी ग्राहक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात़
पेट्रोलपंपावर माप ठेवने सक्तीचे
पेट्रोलपंपावर इलेक्ट्रॉनिक माप व्यवस्थित असले तरी पेट्रोल टाकणाºया कर्मचाºयाकडून कमी पेट्रोल दिले जाऊ शकते़ अशावेळी ग्राहकांना शंका आली तर प्रत्येक पेट्रोलपंपावर हाताने पेट्रोल मोजता येतील अशी मापे ठेवलेली असतात़ तसेच अशी मापे ठेवणे हे सक्तीचे आहे़ ग्राहकांनी त्या मापात विकत घेतलेल्या पेट्रोलची पडताळणी करावी़ यात फसवणूक झाली असेल तर तत्काळ वैध मापनशास्त्र विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक अलकेश गेटमे यांनी केले आहे़
दिलेल्या किमतीत योग्य वजनाची वस्तू मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे़ कुठेही माल घेताना वजनात फसवणूक झाली तर ग्राहकांनी हा विषय टाळून न देता थेट वैध मापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार करावी, प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीची योग्य दखल घेऊन पुढील कार्यवाही केली जाते़ - अलकेश गेटमे, सहायक नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग