सिद्धटेक, दुधोडी येथे जप्त केली यांत्रिक बोट

By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:08+5:302020-12-05T04:34:08+5:30

कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखांचा ...

Mechanical boat seized at Siddhatek, Dudhodi | सिद्धटेक, दुधोडी येथे जप्त केली यांत्रिक बोट

सिद्धटेक, दुधोडी येथे जप्त केली यांत्रिक बोट

कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील चौथा आरोपी फरार आहे.

सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली होती. त्या माहितीआधारे मंगळवारी पहाटे पोलीस पथकाने भीमा नदीपात्रात स्पीड बोटीच्या साह्याने प्रवेश केला. त्यावेळी एक यांत्रिक बोट व उपसा करणारे मशीन असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी मजहरुल शेख (वय १९), हुमायून शेख (वय १९) व अलीम शेख (वय २५, सर्व रा. कठ्ठलवाडी, साहेबगंज, झारखंड, हल्ली मुक्काम रा. खेड, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस कर्मचारी सागर मेहेत्रे, सुनील खैरे, मनोज लातूरकर, होमगार्ड संतोष निकत, गवळी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Mechanical boat seized at Siddhatek, Dudhodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.