कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:43 AM2018-02-13T11:43:33+5:302018-02-13T11:44:32+5:30

मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक झाली. या बैठकीत आमदार पिचड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

A meeting to attack at Kotil; Good day to the thieves - the splendor of the splendor | कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड

कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड

कोतुळ : राज्यात आणि देशात जनतेच्या भावनांना हात घालून खोटी आश्वासने देणा-या थापेबाजांना अच्छे दिन आले आहेत. शेतकरी, व्यापारी, कामगार व सामान्य माणसाची फसवणूक सरकारने केली आहे. या फसवणुकीचा पदार्फाश करण्यासाठी राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू आहे, असे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक झाली. या बैठकीत आमदार पिचड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख, सयाजी देशमुख, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब घाटकर, मनोज देशमुख, शांताराम साबळे, रावजी धराडे, मारुती गोडे, रामनाथ आरोटे, दिनकर पवार आदी उपस्थित होते. १६ फेबु्रवारी रोजी अकोले तालुक्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन होणार आहे.

Web Title: A meeting to attack at Kotil; Good day to the thieves - the splendor of the splendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.