कोरोना उपाययोजनांबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:05+5:302021-05-08T04:22:05+5:30
... केडगाव लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी अहमदनगर : केडगाव उपनगरातील लोकसंख्या मोठी असून, नागरिक लस घेण्यासाठी केंद्राबाहेर रांगा ...
...
केडगाव लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
अहमदनगर : केडगाव उपनगरातील लोकसंख्या मोठी असून, नागरिक लस घेण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. परंतु, एकच केंद्र असल्याने गर्दी होते. त्यामुळे या भागात महापालिकेने आणखी एक लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे.
....
दहा हजार डोस संपले
अहमदनगर : राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १० हजार डोस दिलेले होते. हे डोस शुक्रवारी संपले. शनिवारी महापालिकेला किती डोस मिळतात, त्यावरच लसीकरणाचे नियोजन केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या हलचाली
अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. परंतु, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने बेड मिळत नाहीत. त्यामुळे महापालिका व काही सामाजिक संस्थांकडून ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून देण्याच्या हलचाली सुरू आहेत.
....