प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत ग्रामविकासमंत्र्यांबरोबर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:26 AM2021-02-05T06:26:50+5:302021-02-05T06:26:50+5:30
पारनेर : रावसाहेब रोहोकले व प्रवीण ठुबे हे सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास ...
पारनेर : रावसाहेब रोहोकले व प्रवीण ठुबे हे सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित प्रश्नांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.
पारनेर तालुका शिक्षक परिषद व रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाच्या पारनेर येथील त्रैवार्षिक अधिवेशनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.
आमदार लंके म्हणाले,
परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, पोपट नवले, सचिन गाडीलकर या त्रिकुटाने सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात दिलेल्या योगदानामुळेच शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळावर सर्वसामान्य शिक्षकांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वास व्यक्त केला आहे.
तांबे म्हणाले, रावसाहेब रोहोकले यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा कसा करावा हे शिकण्यासारखे आहे. विधानपरिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांबाबत राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करत असतो. बदल्यांबाबत सर्वसमावेशक धोरण लागू करण्याकरिता आग्रही भूमिका घेऊ.
प्रास्ताविक प्रवीण ठुबे यांनी केले. राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न या ठिकाणी मांडले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते, अर्चना गोजमगुंडे, गुरूमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, आर. पी. रहाणे, संजय शिंदे, राजेंद्र जायभाय, बाबा पवार, केंद्रप्रमुख संघटनेचे अशोक ढगे, विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ ढोकरे, उपाध्यक्ष गोरख देशमुख, खजिनदार संजय उदार, श्रीकृष्ण खेडकर, राम निकम, दत्ता गमे, खंडेराव उदे, रवि कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पोटे व ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले. सुनील दुधाडे यांनी आभार मानले.