शिर्डी सोसायटीची सभा झाली वादळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:48+5:302021-01-18T04:18:48+5:30
मीनाक्षी प्रमोद गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीची वार्षीक सभा आयोजित करण्यात आलेली होती. सभेला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ...
मीनाक्षी प्रमोद गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली विकास सोसायटीची वार्षीक सभा आयोजित करण्यात आलेली होती. सभेला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, सुजित गोंदकर, प्रताप जगताप, अभय शेळके पाटील, दिगंबर कोते, रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, नीलेश कोते यांच्यासह संस्थेचे सभासद संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, संस्थेच्या अहवालातील फोटोच्या मुद्द्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी गटाला याबाबत जाब विचारला.
शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, विजय जगताप यांच्यासह शिवसेनेच्या कायकर्त्यानी सभास्थळी अहवाल फाडून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी कैलास कोते भाषण करत असताना संस्थेचे माजी अध्यक्ष प्रताप जगताप आणि संचालक आप्पासाहेब कोते, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या.
.................................
शेतकऱ्यांची मालकीची असलेल्या संस्थेच्या वार्षीक अहवालात संस्थेला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांचे फोटो छापण्याची परंपरा आहे. संस्थेत पक्षीय राजकारण न आणण्याच्या परंपरेचे पालन होत असताना काही मंडळीनी गलिच्छ राजकारण सुरू केले आहे.
-मीनाक्षी प्रमोद गोंंदकर, अध्यक्ष, विकास सोसायटी
...................
संस्थेच्या अहवालानरून काहींनी राजकारण सुरू केले. आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे हे संस्थेचे मार्गदर्शक आहेत. संस्थेच्या जडनघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. बिगरसभासद असलेल्या काही लोकांनी अहवाल फाडून शिर्डीकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत.
-कैलास कोते, माजी नगराध्यक्ष
.........................
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार यांचे फोटो अहवालात नाहीत. आपल्या नेत्याला खूश करण्यासाठीच सभासद नसलेल्यांचे फोटो छापले त्याचा आम्ही निषेध केला आहे.
- सचिन कोते, शहर प्रमुख, शिवसेना
( १७ शिर्डी सेना)