आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचा स्मृतिदिन; आतापर्यंत ६०० जणांचे रक्तदान
By सुदाम देशमुख | Published: March 28, 2023 02:44 PM2023-03-28T14:44:43+5:302023-03-28T14:47:09+5:30
दुपारी दोन वाजेपर्यंत ६०० जणांनी रक्तदान करून अनोखे अभिवादन केले. रक्तदान अजुनही सुरूच आहे.
सुदाम देशमुख, अहमदनगर: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३१ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने श्री. तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, श्री. तिलोकरत्न आनंद मानवसेवा केंद्र यांच्या विद्मामाने व अहमदनगर मर्चन्टस को. ऑप. बँक. लि. यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन भक्त निवास येथे मर्चन्टस बँकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते व परमपूज्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत ६०० जणांनी रक्तदान करून अनोखे अभिवादन केले. रक्तदान अजुनही सुरूच आहे.
रक्तदान शिबिराच्या सुरवातीला महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनरुषीजी महाराज प. पु. अलोक ऋषीजी महाराज यांनी मांगलिक, मंगलपाठ (शुभ संदेश ) देऊन या स्तुत्य उपक्रमास आशीर्वाद दिले. प्रास्तविक व स्वागत डॉ. विजय भंडारी यांनी केले. या भव्य अशा रक्तदान शिबिराचे हे २७ वे वर्ष आहे.
आजपर्यंत २७ हजार सर्व समाजातील स्त्री -पुरुषांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. हजारोंना जीवनदान यातून मिळाले आहे. त्या सर्व रक्तदात्यांना आयोजकांनी धन्यवाद दिले. शिबिरासाठी रक्तदात्यांची मोठी गर्दी असून सायंकाळपर्यंत रक्तदात्यांची वाढेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"