मनोरुग्ण तरुणीला मिळाला ‘माउली’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:02+5:302021-01-20T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : सध्याच्या काळात जन्मदात्या आई-बापाला घरातून बाहेर काढत वाऱ्यावर सोडून दिले जाते. अशा परिस्थितीत नगर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : सध्याच्या काळात जन्मदात्या आई-बापाला घरातून बाहेर काढत वाऱ्यावर सोडून दिले जाते. अशा परिस्थितीत नगर तालुक्याच्या माउली प्रतिष्ठानचे डॉ.धामणे हे गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ व मनोरुग्ण असलेल्या लोकांना उपचार देत आहेत. राहुरी शहरात १५ जानेवारी रोजी फिरणाऱ्या एका मनोरुग्ण वेडसर तरुणीला त्यांनी ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत.
राहुरी शहरात गेल्या काही वर्षभरापासून एक सुमारे २० वर्षीय तरुणी वेडसरपणात फिरत होती. मेंदूवर कोणताही ताबा नसल्याने तिचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले होते. अशा परिस्थितीत लोक जे देतील, ते खायचे ऊन, वारा पावसात नगर-मनमाड राज्यमहामार्ग व शहरातील काही रस्त्यावर फिरून मिळेल, त्या ठिकाणी आसरा घेत असे. आपल्याच धुंदीत कुठलेही भान नसल्याने सैरभैरपणे फिरणे हा तिचा नित्याचा दिनक्रम ठरलेला. मानवतेच्या या युगात वेडसर असलेल्या मनोरुग्ण तरुणीला चांगले उपचार मिळावे, इतरांप्रमाणे तिलाही मानवी जगण्याचा आनंद प्राप्त व्हावा, या उदात्त हेतूने शहरातील तरुणांनी डॉ.राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधत सदर तरुणीबाबत त्यांना माहिती दिली. सदर मनोरुग्ण तरुणीचा शोध घेऊन ती वेडसरपणात कॉलेज रोड परिसरात रस्त्याच्या कडेला बसून देवपूजा करत होती. यावेळी डॉ.धामणे व त्यांचे सहकारी यांनी राहुरीत येऊन त्या तरुणीला ताब्यात घेतले. पुढील तिला उपचारासाठी नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठान येथे घेऊन गेले.
....
समाजात कोणी अनाथ किंवा वेडसर असतील किंवा ज्यांना कुणाचा आधार नाही, अशा लोकांची माहिती आम्हाला कळवावी, जेणेकरून रस्त्यावर भटंकती करत असताना, प्रसंगी अत्याचार होऊन मानसिक खच्चीकरण झालेल्या मनोरुग्णांना मानसिक, तसेच वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असते. अशा वेळी माउली प्रतिष्ठान सदैव मनोरुग्णांच्या सेवेत दाखल होऊन, त्यांना इतर मानवांप्रमाणे सर्वसामान्य जीवण जगण्यासाठी उभे करत असते. यासाठी समाजात असे कोणी मनोरुग्ण असतील, तर त्यांना योग्य उपचार मिळवून देत आधारासाठी आमच्या माउली प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.
- डॉ.राजेंद्र धामणे, माउली प्रतिष्ठान, नगर