प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 03:30 PM2019-03-07T15:30:00+5:302019-03-07T15:30:14+5:30

जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख लाभार्थी आहेत. मात्र प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळाले याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळ उडाला आहे.

 The mess of Prime Minister Kisan Samman Yojana | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा गोंधळ

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा गोंधळ

अहमदनगर : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख लाभार्थी आहेत. मात्र प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत पैसे मिळाले याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही गोंधळ उडाला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रूपये तीन टप्प्यात मिळणार आहेत. त्यातील २ हजार रूपयांचा पहिला टप्पा शेतकºयांना दिला असल्याचे शासनाने जाहीर केले.
त्यामुळे जिल्ह्यातील कितीजण या योजनेसाठी पात्र आहेत किंवा जिल्ह्यासाठी किती रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली, याबाबत या योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे माहिती घेतली असता, त्यांनी रकमेबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
जिल्हा प्रशासन पातळीवर योजनेस प्रसिद्धी देणे, योजनेच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार माहिती संकलित करून ती शासकीय पोर्टलवर अपलोड करणे एवढेच काम होते. प्रत्यक्ष किती शेतकºयांना पैसे आले याबाबत कृषी आयुक्त कार्यालयाकडे माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले.
त्यामुळे या योजनेची प्रत्यक्ष काय स्थिती आहे, याबाबत सर्वच पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र शासनाने मागील आठवड्यात या योजनेच्या पहिल्या टप्प्यापोटी पात्र शेतकºयांच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केल्याचे जाहीर केले आहे. मात्र असे कोणतेही पैसै जमा झाल्याबाबत शेतकºयांकडून दुजोरा मिळालेला नाही. जिल्ह्यातील काही शेतकºयांनी तर पैसै आले व पुन्हा मागे गेले अशा तक्रारी केल्या आहेत, तर बºयाच शेतकºयांनी आपले खातेच तपासले नसल्याने खरंच असे पैसे आले आहेत का याबाबत त्यांनाही माहिती नाही. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत १ हजार ६०१ गावांतील ८ अ प्रमाणे ९ लाख ४३ हजार ६४२ खातेदार शेतकºयांची संख्या असून या योजनेंतर्गत परिशिष्ट ८ अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलित झालेल्या १ हजार ६०१ गावांतील पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या ५ लाख ६८ हजार २४१ इतकी आहे. त्यापैकी ४ लाख ३० हजार शेतकºयांची माहिती आतापर्यंत एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

Web Title:  The mess of Prime Minister Kisan Samman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.