संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 04:17 PM2019-09-04T16:17:55+5:302019-09-04T16:20:26+5:30

प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.

A message of friendship and peace through the anniversary | संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

संवत्सरी पर्वातून मैत्री आणि शांततेचा संदेश

सन्मतीवाणी
प्रत्येक जण चूक करतो. त्या चुकांबद्दल कबुली देणे, त्या मान्य केल्यामुळे अनेक समस्या सुटतात. एकमेकांविषयी गैरसमज दूर होतात. मैत्री व शांततेचे वातावरण तयार होते. संवत्सरी पर्व मैत्री व शांततेचा संदेश देणारे पर्व आहे.
पर्युषण पर्वात जास्तीत जास्त धर्म आराधना करण्याची सुवर्णसंधी असते. त्या संधीचा फायदा घेऊन धर्म आराधना करुन प्रत्येकाने मन निर्मळ करावे. आत्मशुध्दी, शरीर शुध्दी करण्याची संधी या पर्वात असते. अंतगढ सूत्रात आठ वर्ग असून ९० अध्याय आहेत. या सूत्रात जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. धर्मस्थानावर आपण कशासाठी येतो याचा विचार करा. तुमच्या जवळ सर्वकाही आहे, पण तुम्हाला त्याचा विसर पडला. तुमच्या अंतर्मनावर विषयांची धूळ साचली आहे. ती धूळ साफ करुन मन निर्मळ करा. स्वत:ची नजर बदलली तर सर्व जगच चांगले दिसेल. पर्युषण पर्व ही संधी आहे. 
संवत्सरी पर्व शांतता व मैत्रीचा संदेश देते. मनुष्य चुका करतो, पण त्या कबुल करण्यातच प्रत्येकाचे हित आहे. आपल्या चुका दुसºयावर ढकलू नका. आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली तर मन साफ होईल. मैत्री व प्रेमाचे वातावरण तयार होईल. नाते संबंधातील दरी दूर करा. वेगळाच आनंद मिळू शकतो. आत्मपरीक्षण करीत रहा. म्हणजे तुम्हाला चुका दुरुस्त करण्याची संधी मिळेल.
आपली चूक एक पुस्तकाचे पान आहे. तर नातेसंंबंध हे पुस्तक आहे. केवळ चुकीमुळे आपण पाने फाडू शकतो पण नाती टिकविण्यासाठी पुस्तक फाडू शकत नाही. आधी तुम्ही स्वत: बदला. दुसरे आपोआप बदलतील याची खात्री ठेवा. आपण जी चूक करतो, त्यामुळे आयुष्य खराब होते. आपले जीवन आंब्याप्रमाणे मधूर, गोड बनवा. लिंबाप्रमाणे कडवटपणा नको. जीवनात कडूपणाचा दुर्गंध पसरु देऊ नका. माणसामाणसात मैत्रीचे संबंध निर्माण झाले तर जगातून द्वेषाचे वातावरण कमी होईल. मानव जातीला आनंदाचे, सुखाचे दिवस येतील.
-पू.श्री.सन्मती महाराज

Web Title: A message of friendship and peace through the anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.