तीन दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:10 PM2020-06-17T12:10:03+5:302020-06-17T12:10:47+5:30

अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला आगामी तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

Meteorological Department warns of three days of torrential rain | तीन दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

तीन दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला आगामी तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

  हवामान खात्याने पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हा पाऊस नगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी होईल. बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. तसेच सोसाट्याचा वाराही मोठ्या प्रमाणात वाहण्याची शक्यता आहे.

    मंगळवारी दिवसभर निरभ्र आकाश होते. तसेच वारेही होते. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसले. मृग नक्षत्राने सलग दोन दिवस दमदार हजेरी लावली. मंगळवारी मात्र पावसाने विश्रांती दिली. 
 

Web Title: Meteorological Department warns of three days of torrential rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.