म्हसे शिवारात छापा, घोड नदी पात्रात वाळू उपसा करणा-या चार बोटी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 10:58 AM2020-12-19T10:58:35+5:302020-12-19T11:35:47+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार यांचे भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदी पात्रात शनिवारी भल्या पहाटे छापा टाकून वाळूची तस्करी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी जिलेटीनचा स्फोट करून उध्वस्त केल्या आणि दहा लाखाचा एक ट्रक जप्त केला आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार महसुल विभागाने वाळू तस्कराला लगाम घातला आहे पण काही वाळू तस्कर राजाश्रयाखाली रात्रीच्या वेळी वाळूची तस्करी करीत होते ही माहीती तहसीलदार प्रदिप पवार यांना समजली
शनिवारी पहाटे चार वाजता मंडलाधिकारी प्रशांत कांबळे भरत चौधरी व कामगार तलाठी पोटे व पवन मोरे यांना बरोबर घेऊन तहसीलदार प्रदिप पवार यांनी चार बोटी व एक ट्रक म्हसे येथील माळवाडी शिवारात नदी पात्रात पकडले
सकाळी सहा वाजता जिलेटीनचा स्फोट करून बोटी फोडून टाकल्या आणि ट्रक बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिला. बोटी मालक व ट्रक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे
तस्करांचीउडालीझोप
तहसीलदार प्रदिप पवार यांनी यांनी भल्या पहाटे कारवाई केल्यांनी वाळू तस्कराची झोप उडाली आहे तहसीलदार प्रदिप पवार म्हणाले कि कोण नदी ओढे पात्रात वाळू तस्करी करत असेल माहिती कळवा नाव गुपीत ठेवून कारवाई करणार आहे.