पिंपळगाव लांडगामधील टोलनाक्याचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:05 PM2017-10-07T20:05:19+5:302017-10-07T20:17:43+5:30
कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील पिंपळगाव लांडगा येथे टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या जमिनी बागायती असल्याने टोल नाका पुढे करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.
अहमदनगर : कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावरील पिंपळगाव लांडगा येथे टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु या जमिनी बागायती असल्याने टोल नाका पुढे करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्वेक्षण होऊन हा टोल नाका मराठवाडी येथील बारवेजवळ प्रस्तावित करण्यात आला असून, कामही सुरू झाले आहे.
पाथर्डी रोडवरील पिंपळगाव लांडगा येथील मेहेकरी येथील शेतकरी खंडू बहिरू लांडगे, प्रभाकर शिदू पुंडे, नाथा संतू कुमटकर व इतर १२ शेतकरी यांच्या जमिनीवर टोल नाका प्रस्तावित करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सीए राजेंद्र काळे यांच्यासह शेतकºयांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर परिस्थिती मांडली. या जमिनी बारामाही बागायती आहेत.
यावेळी गडकरी यांनी सांगितले, की शेतकºयांच्या ज्या जमिनी पडीक आहेत, त्याच ठिकाणी संबंधित शेतकºयांच्या संमतीनेच टोल नाका करण्यात यावा. त्याचा योग्य मोबदला शेतकºयांना दिला जाईल. परंतु शेतकºयांच्या बागायती जमिनीवर टोल नाका होणार नाही याचीही ग्वाही गडकरी यांनी दिली. या निर्णयामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजंूची २२ एकर जमीन शेतकºयांना पुन्हा एकदा कसायला मिळणार आहे. दिल्लीतील कार्यालयात बसून सॅटेलाइटच्या आधारे कुठल्याही जमिनीवर आरक्षण टाकू नका. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करूनच निर्णय घ्यावा, अशाही सूचना गडकरी यांनी अधिकाºयांना केल्या.