विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:20 IST2020-10-21T15:17:42+5:302020-10-21T15:20:15+5:30
विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावात बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा मृत्यू
टाकळीमानूर : विहिरीत पाय घसरुन पडल्याने मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडे गावात बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुनिता नारायण हिंगे (वय ४२), प्रतिक्षा नारायण हिंगे (वय १४) असे या घटनेत मृत्यू पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. या मायलेकी बुधवारी सकाळी आठ वाजता शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. शेतात गेल्यानंतर मुलगी प्रतिक्षा हिंगे ही शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. ती बराच वेळ होऊनही परत न आल्याने आई विहिरीकडे गेली. मुलगी विहिरीत बुडाली हे लक्षात आले. यानंतर आई सुनीता हिने मुलीचा शोध घेण्यासाठी विहिरीत डोकावले असता तिचाही पाय घसरुन विहिरीत पडून दुर्दवी अंत झाला. या घटनेचे गावात हळहळ व्यक्त होत आहे.