साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 04:49 PM2020-08-01T16:49:09+5:302020-08-01T16:50:01+5:30
साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले.
शिर्डी : साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले.
साईबाबा मंदिर परिसरालगतच्या प्रांगणात शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घातला़ दुग्धाभिषेक केलेले दूध साईबाबा मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांना पाजण्यात आले़ अपयशी राज्य शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात घोषणा दिल्या. शेतकºयांच्या दुधाला कमीत कमी ३० रुपये भाव द्यावा.
याप्रसंगी नितीन उत्तमराव कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, सचिन शिंदे, अशोक गोंदकर, किरण बोºहाडे, रवींद्र गोंदकर, सचिन कोते, दीपक वारूळे, अशोक पवार, शब्बीरभाई सय्यद, रमेश कोते, भरत चांदोरे, लखन बेलदार, तुषार काटकर उपस्थित होते़