दूध आंदोलन पेटले : अकोलेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:12 PM2018-07-18T17:12:00+5:302018-07-18T17:12:09+5:30

राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली.

Milk movement agitated: Combustion of Akola's image of Chief Minister | दूध आंदोलन पेटले : अकोलेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

दूध आंदोलन पेटले : अकोलेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन

अकोले(जि.अहमदनगर) : राज्यात दूध आंदोलन पेटले असून त्याचे पडसाद बुधवारी अकोलेत उमटले. येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केली. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या सहा जणांना अटक करुन पोलिसांनी सोडून दिले.
बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान दूध उत्पादक शेतकरी शहरातील बसस्थानकावर एकत्र झाले. ‘दुधाला पाच रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, फसणवीस सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत बसस्थानकासमोर कोल्हार-घोटी राज्य मार्गावर येवून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा असलेला फ्लेक्स जाळला.  दूध उत्पादकांचे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा स्पष्ट केला.
सरकार दुधाची पावडर बनविणा-या कंपन्यांना प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची फसवी घोषणा करीत असून कष्टकरी दूध उत्पादकांना वा-यावर सोडले आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान न मिळाल्यास उद्या गुरुवारी ९ वाजता इंदोरी फाटा येथे जनावरांसह चक्का जाम आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
स्वभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, तालुकाध्यक्ष चंद्रकांत नेहे, सुभाष येवले, प्रकाश मालुंजकर,भाऊराव सावंत, संदीप नवले, भरत नवले, लक्ष्मण नवले, अतुल लोहटे, अरुण आरोटे, नामदेव आरोटे, बाळासाहेब मालुंजकर आदी शेतकरी उपस्थित होते. अचानक हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची कोणतीच कल्पना पोलिसांना नव्हती. ‘दहन व होळी’झाल्यानंतर पोलीस आंदोलनस्थळी पोहचले.

राज्यातील फडणवीस नव्हे, फसवणीस सरकार पावडरला सवलत देण्याची फसवी घोषणा करीत आहे. या ठिम्म सरकारचा निषेध करीत त्यांना वठणीवर आणल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही. शेतक-यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान ही मागणी पूर्ण झाली नाही तर गुरुवारी सकाळी इंदोरी फाटा येथे गाया-वासरांसह रस्त्यावर उतरुन चक्का जाम आंदोलन करु. - दशरथ सावंत, माजी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

 

 

Web Title: Milk movement agitated: Combustion of Akola's image of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.