जामखेडमध्ये दूध रस्त्यावर ओतले, स्वाभिमानीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:19 PM2020-07-21T12:19:21+5:302020-07-21T12:20:06+5:30

जामखेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूधाच्या दरात १० रुपये वाढ करावी, या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी तालुक्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

Milk poured on the streets in Jamkhed, Swabhimani's agitation | जामखेडमध्ये दूध रस्त्यावर ओतले, स्वाभिमानीचे आंदोलन

जामखेडमध्ये दूध रस्त्यावर ओतले, स्वाभिमानीचे आंदोलन

जामखेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूधाच्या दरात १० रुपये वाढ करावी, या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाºयांनी तालुक्यात दूध बंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश  आजबे, संघटनाप्रमुख हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अ‍ॅड. ऋषीकेश डुचे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जनार्दन भोंडवे, नितीन जगताप, अशोक आजबे, प्रदीप वाळुंजकर, आप्पासाहेब डोके, बंडू मुळे,महादेव डोके, बाबू साळुंखे, आबासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे, अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे, अविराज मोरे, अश्विन खैरे आदी उपस्थित होते.

दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हभर आंदोलन सुरू केले आहे. नगर जिल्ह्यात आज जामखेड, नेवासा आदी भागात आंदोलन सुरू  झाले आहे. 

Web Title: Milk poured on the streets in Jamkhed, Swabhimani's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.