बांधावरच्या शेवग्यातून लाखाची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:07 PM2018-07-20T13:07:27+5:302018-07-20T13:07:46+5:30
वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे.
यमन पुलाटे
राहाता : वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे.कृषी पदवीधर असलेल्या संजय बबनराव राऊत यांनी आपल्या शेताच्या बांधावर शेवगा लावला. कृषी विज्ञान केंद्राकडून पी.के. एम.-१ ची पाच रोपे आणली. ती बांधावर चांगली बहरली. घरचे भागून स्थानिक कोल्हारच्या आठवडे बाजारात विक्री करताना शेवग्याला कायमचं २० ते २५ रुपयांचा दर मिळाला. मग हाच बागायत शेवगा शेतात लागवड करण्याचा निर्णय घेतला, मनात प्रश्न होता आपली काळी जमीन बागायत क्षेत्र शेवगा लागवड शक्य होईल का? म्हणून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, शांताराम सोनवणे, सुनील बोरुडे आणि भरत दंवणे यांच्या सोबत चर्चा केली. शेवगा लागवडीचा निर्णय घेऊन पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मोठी बेड तयार केली. जून २०१६ ला केंद्राकडून ३०० रोपे घेतली. त्यांची लागवड १२७६ अंतरावर केली. सुरुवातीला शेण खतांचा वापर केला. सहा महिन्यात शेवगा चांगला बहरला. सुरुवातीला एका झाडापासून सरासरी २५ ते ३० किलो शेंगा मिळत. शेवगा पूर्णता सेंद्रीय करायचा ही जिद्द ठेऊन शेवगा पिकास गांडूळ खत, व्हर्मीवॉश आणि जिवाणू स्लरीचा वापर सुरु केला. रस शोषणाºया किडींसाठी करंज तेल आणि निंबोळी तेलाचा वापर करीत या झाडापासून सध्या प्रत्येकी ५० ते ६० किलो शेंगा मिळत असून वर्षातून सरासरी खर्च वजा जाता. लाखांचे उत्पादन सध्या मिळत आहे.
शेवगा हा गुणकारी आहे. शेवग्यांच्या पाने, फुले आणि शेंगा असे तिहेरी उत्पादन मिळते. आयुर्वेदात शेवग्याला महत्व असल्याने बाजारात वर्षभर मागणी असते. लोणी, कोल्हार, राहाता, श्रीरामपूर या स्थानिक बाजारात विक्री करीत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
शेवगा हे पीक जिरायत भागाबरोबरच बागायत भागासाठी वरदान आहे. छाटणी तंत्र, गांडूळ खतांचा वापर तर ठिबकव्दारे स्लरी आणि व्हर्मीवॉशचा वापर केला तर उत्पादन चांगले मिळते. शेतकºयांनी वेगळं काही तरी केले तर नक्कीच फायदा हा होत असतो. शेती हा व्यवसाय नाहीतर तो उद्योग आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग असला तर प्रगती होत असते. शेतीमध्ये वेगळेपणा जपला तर आपली भूमाता आपल्याला यश हमखास देत असते. यासाठी वडील बबनराव, आई रुख्मिणीबाई, पत्नी स्वाती, भाऊ विजय, भावजयी सीमा यांची मदत होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.