पाथर्डीत घरामधून लाखोंचा मावा जप्त; पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 02:38 PM2020-03-25T14:38:22+5:302020-03-25T14:39:29+5:30
पाथर्डी शहरातील इंदिरानगर उपनगरात अक्षय इधाते यांच्या राहत्या घरामधून पाथर्डी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त रितीने बुधवारी सकाळी कारवाई करीत लाखो रुपयांचा मावा, सुगंधित सुपारी जप्त केली आहे.
पाथर्डी : शहरातील इंदिरानगर उपनगरात अक्षय इधाते यांच्या राहत्या घरामधून पाथर्डी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त रितीने बुधवारी सकाळी कारवाई करीत लाखो रुपयांचा मावा, सुगंधित सुपारी जप्त केली आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक विलगीकरणाचे धोरण राबविण्यात येत आहे. यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने शहरातील टपºया व दुकाने बंद झाले आहेत. पोलिसांचा ससेमीरा टाळण्यासाठी टपरी चालकांनी थेट राहत्या घरातून अवैध रितीने मोठ्या प्रमाणावर मावा, सुपारी व दारू विक्री सुरु केली आहे. मावा विक्रेत्यांच्या घरी गर्दी होत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे.
मावा विक्री होत असल्याची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस व महसूल विभागाने ही कारवाई केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.