मिनी एटीएमची चाचणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:22 AM2021-03-31T04:22:25+5:302021-03-31T04:22:25+5:30

...... कोरोनाचे अहवाल मिळणार २४ तासांत अहमदनगर : कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यास विलंब होत असल्याने महापालिकेने स्रवांचे नमुने ...

Mini ATM testing begins | मिनी एटीएमची चाचणी सुरू

मिनी एटीएमची चाचणी सुरू

......

कोरोनाचे अहवाल मिळणार २४ तासांत

अहमदनगर : कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यास विलंब होत असल्याने महापालिकेने स्रवांचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील खाजगी प्रयोगशाळेशी करार करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे या संस्थेला स्रवाचे नमुने पाठविल्यानंतर २४ तासांत अहवाल मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

....

कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीबाबत संभ्रम

अहमदनगर : शासानने सर्व कार्यालयांत ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याबाबत सुचविले आहे. परंतु, अधिकृत आदेश प्राप्त न झाल्याने सर्वच आस्थापनांमध्ये याबाबत संभ्रम आहे.

.....

शहरात वाहतुकीची कोंडी

अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कोठी येथून पुढे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चारचाकी, अवजड वाहनेही शहरातून जात असून, त्यात शहरातील रस्ते ठिकठिकाणी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे शहरतील सर्वच मार्गांवर कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याने गर्दी होताना दिसत आहे.

....

रमेश भांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर : रुछत्तीसीचे सरपंच रमेश भांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार अरुण जगताप, नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, अंबादास गारुडकर आदी उपस्थित होते.

....

महालक्ष्मी उद्यानात १३ फुटी मत्स्यशिल्प

अहमदनगर : येथील रुषीकेश चांदगुडे यांनी १ टन लोखंडापासून तयार केलेले १३ फुटी मत्स्यशिल्प महालक्ष्मी उद्यानात बसविण्यात आले आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, उद्यान विभाग प्रमुख मेहर लाहारे आदी उपस्थित होते.

....

केडगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर : केडगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी जाहीर केली. केडगाव विभाग प्रमुख म्हणून तुकाराम कोतकर, प्रभाग क्रमांक १६ प्रमुखपदी रुषीकेश गवळी, न्यू आर्टस महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी विशाल सकट यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, शुभम बंब, राहुल नेटके, संजय तवले आदी उपस्थित होते.

Web Title: Mini ATM testing begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.