संगमनेरात मंत्री राणे यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:00+5:302021-08-25T04:26:00+5:30

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री राणे यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केंद्रीय ...

Minister Rane's protest at Sangamnera | संगमनेरात मंत्री राणे यांचा निषेध

संगमनेरात मंत्री राणे यांचा निषेध

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री राणे यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री राणे यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवसेनेचे तुमसर, मोहाडी तालुक्याचे (जिल्हा. भंडारा) संपर्क प्रमुख नरेश माळवे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत पवार, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांसह दीपक साळुंके, विकास डमाळे, भाऊसाहेब हासे, अमोल कवडे, मुजीब शेख, अमित चव्हाण, रमेश काळे, ज्ञानेश्वर कांदळकर, अमोल डुकरे, भीमा पावसे, वेणूगाेपाल लाहोटी, राजेंद्र सातपुते, किरण सानप, प्रथमेश बेल्हेकर, अनुप म्हाळस, शुभम भोईर, रूपेश धाकतोडे, बबन सातपुते, प्रसाद पवार, बाळासाहेब राऊत, सचिन साळवे, माधव फुलमाळी, दीपक वन्नम, संजय फड, शीतल हासे, राजेंद्र झिंजुर्डे, सदाशिव हासे, रवींद्र गिरी, अक्षय बिल्लाडे, पप्पू कानकाटे, असिफ तांबोळी, दत्तू नाईक यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी निवेदन स्वीकारले.

फोटो

Web Title: Minister Rane's protest at Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.