मंत्री रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:41+5:302020-12-14T04:33:41+5:30
शिवसेनेच्या वतीने आंदोलन : इंधनदरवाढीविरूद्ध संताप श्रीरामपूर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात संतापजनक वक्तव्य करतात, ...
शिवसेनेच्या वतीने आंदोलन : इंधनदरवाढीविरूद्ध संताप
श्रीरामपूर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायम शेतकऱ्यांच्या विरोधात संतापजनक वक्तव्य करतात, असा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने शनिवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ त्यांचा निषेध करण्यात आला. पेट्रोल व डिझेल दरवाढीवर टीका करीत सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, जिल्हा संघटक डॉ. महेश क्षीरसागर, व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख रामा अग्रवाल यांची यावेळी उपस्थिती होती.
मदनलाल बत्रा, हितेंद्र गुप्ता, निखिल पवार, राहुल रणधीर, सचिन रसाळ, बाळासाहेब गायकवाड, सुरेश भारस्कर, विष्णू मोढे, आबा बिरारी, सुभाष जंगले, दिनेश पोपळघट, यासीन सय्यद, अरुण पाटील, अशोक थोरे, शरद भणगे, शरद डोळसे आदी उपस्थित होते.
----------
फोटो : १३श्रीरामपूर आंदोलन
ओळी- श्रीरामपूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ इंधन दरवाढ, तसेच मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलन करताना शिवसैैनिक.