मंत्र्यांनी बदली प्रकरणातील पैशातून कोविड सेंटर उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:42+5:302021-04-25T04:20:42+5:30

श्रीगोंदा : महाविकास आघाडीतील मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेतात. त्यात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा आढावा घेतात; मात्र कार्यवाही शून्य आहे. या ...

The minister should set up a covid center with the money from the transfer case | मंत्र्यांनी बदली प्रकरणातील पैशातून कोविड सेंटर उभारावे

मंत्र्यांनी बदली प्रकरणातील पैशातून कोविड सेंटर उभारावे

श्रीगोंदा : महाविकास आघाडीतील मंत्री कोरोनाच्या आढावा बैठका घेतात. त्यात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा आढावा घेतात; मात्र कार्यवाही शून्य आहे. या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात कमाविलेल्या पैशातून राज्यात कोविड सेंटर सुरू करावेत. शासनाच्या पैशातून सुरू असलेल्या कोविड सेंटरवर पाट्या लावू नयेत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.

विखे यांनी शनिवारी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, पिंपळगाव पिसा, घारगाव, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव येथील कोविड सेंटरला व काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. विखे यांनी तालुक्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या सर्व कोविड सेंटरला प्रत्येकी ५० हजार व शासकीय कोविड सेंटरला एक लाख रुपयांची मदत केली.

विखे म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू केले, ही आनंदाची बाब आहे. इतर तालुक्यात अशी कोविड सेंटर सुरू झाली, तर शहरात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा लोंढा थांबेल. या काळात जे कार्यकर्ते मदत करतील, त्यांना समाज कधीच विसरणार नाही. बाळासाहेब नाहाटा तुम्ही आणखी वेगाने काम करा, तुम्हाला आणखी मदत करीन, अशी ग्वाही विखे यांनी दिली.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी राहुल जगताप भय्या लगड, हेमंत नलगे, डाॅ. चंद्रशेखर कळमकर, प्रवीण मुनोत, मनेश पाटील, विजय नलगे, लालासाहेब काकडे, रमेश खोमणे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी राहुल जगताप भय्या लगड, हेमंत नलगे, डाॅ. चंद्रशेखर कळमकर, प्रवीण मुनोत, मनेश पाटील, विजय नलगे, लालासाहेब काकडे, रमेश खोमणे आदी उपस्थित होते.

---

भाजपकडे रेमडेसिविर कोठून आली?

भाजपकडे रेमडेसिविर इंजेक्शन कोठून आली? या प्रश्नावर विखे म्हणाले की, रेमडेसिविर इंजेक्शनशी भाजपचा कोणताही संबंध नाही. विखे पाटील घराण्याचे काही उद्योजकांशी संबंध आहेत. आमच्या काॅलेजमध्ये शिकून काहींनी कंपन्या टाकल्या. त्यामुळे अशा उद्योजकांकडूनच विमानाने दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणले आणि रुग्णांना दिले. डाॅक्टरांनी गरज असेल तरच रेमडेसिविर इंजेक्शन द्यावे. विनाकारण रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये.

---

२४ श्रीगोंदा कोविड

श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरला खासदार डॉ. सुजय विखे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर, आमदार बबनराव पाचपुते व इतर.

Web Title: The minister should set up a covid center with the money from the transfer case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.