गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली माजी मंत्री राम शिंदे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:46 PM2020-07-25T15:46:23+5:302020-07-25T15:46:48+5:30

हळगाव : राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली.

Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai called on former Minister Ram Shinde | गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली माजी मंत्री राम शिंदे यांची भेट

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतली माजी मंत्री राम शिंदे यांची भेट

हळगाव : राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली.


राज्याचे माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे गत पंधरवाड्यात अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भेट दिली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे राम शिंदे यांच्याशी गृहराज्यमंत्री देसाई यांनी संवाद साधला. राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचीही मंत्री देसाई यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली.

यावेळी पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद, मंगेश चिवटे, जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, पणन संचालक पांडुरंग उबाळे, सरपंच डॉ बाळासाहेब बोराटे, डा. ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच लहू शिंदे, उध्दव हुलगुंडे, डीवायएसपी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील सह आदी उपस्थित होते. चौंडीतील सांत्वनपर भेट आटपून मंत्री देसाई यांचा ताफा करमाळा जि सोलापुरकडे रवाना झाला. 
 

Web Title: Minister of State for Home Affairs Shambhuraje Desai called on former Minister Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.