मंत्र्यांना नगर जिल्ह्यात फिरू देणार नाही : शेतक-यांचा खडकीत रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:44 AM2018-06-10T11:44:24+5:302018-06-10T11:44:55+5:30
शेत मालाला व दुधाला भाव नसल्यामुळेच शेतक-याना आत्महत्त्या करण्याची वेळ आली. यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.
केडगाव : शेत मालाला व दुधाला भाव नसल्यामुळेच शेतक-याना आत्महत्त्या करण्याची वेळ आली. यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. दुधाला कमीत कमी शासनाने ठरवलेला २७ रुपये भाव व शेतमालाला हमी भाव न मिळाल्यास यापुढे पालकमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्याना नगर जिल्ह्यात फिरु देणार नसल्याचा इशारा शेतक-यांनी दिला.
दुधाला व शेत मालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी नगर तालुक्यातील खडकी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे महेश कडूस, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कारभारी गवळी, उपसरपंच भाउसाहेब रोकडे, राहुल बहिरट, अरुण कोठूळे, राघु चोभे, राजेंद्र चोभे, कैलास पठारे, सरपंच जनार्धन माने यांच्यासह विविध गावातिल शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. सुमारे अर्धा तास ास्तारोको करण्यात आला. मंडल अधिकारी विकास झाडे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले.