नगरच्या उड्डाणपुलाला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:49 PM2020-07-10T12:49:08+5:302020-07-10T12:49:57+5:30
नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, अशी महिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी गुरुवारी दिली.
अहमदनगर : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली असून, हे काम सुरू करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यारंभ आदेश देण्याची आवश्यकता आहे. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, अशी महिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी गुरुवारी दिली.
शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची परवानगी नव्हती. ही परवानगी मिळविण्यासाठी खासदार विखे यांनी मध्यंतरी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच शासनाकडे पाठपुरावा केल्याने याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नगर शहरातील उड्डाणपुलासाठी अनुकूल धोरण आखण्यात आले.
या बैठकीत मंत्र्यांनी केलेल्या सुचनेनुसार संरक्षण मंत्रालयाकडून उड्डाणपुलाच्या कामास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या उड्डाणपुलामुळे नगर- औरंगाबाद व नगर- पुणे या मार्गांवरील दळणवळण वाढून नगरच्या विकासास हातभार लागणार आहे. राष्ट्रीय हवाई मार्ग प्राधिकरणाकडून येत्या आॅगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे विखे यांनी सांगितले.