आमदार निलेश लंके यांनी स्वत: केली औषध फवारणी; चास येथे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 03:39 PM2020-03-27T15:39:59+5:302020-03-27T15:41:29+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात फवारणी सुरू झाल्या आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके हे स्वत: या फवारणीसाठी पुढाकार घेत आहेत.
निंबळक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात फवारणी सुरू झाल्या आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके हे स्वत: या फवारणीसाठी पुढाकार घेत आहेत.
नगर तालुक्यात शुक्रवारी (दि.२७ मार्च) आरोग्य केंद्र, दवाखाने अत्यावश्यक सेवेची पाहणी करीत असताना चास (ता. नगर ) येथे फवारणी चालू होती. यावेळी लंके यांनी स्वत: फवारणी करण्यास सुरूवात केली. यावेळी लंके यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका . स्वत:ची काळजी घ्या , मास्क लावा आदी सूचना केल्या.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र काही गावात अजूनही नागरिक बिनधास्त चौकात फिरताना दिसत आहे. वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नाही. सकाळी अकरा वाजेपर्यत रस्त्यावर मोठी दिसत आहे. तरी नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहनही लंके यांनी केले.