आमदार रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा 'मदतीचा हात, ४ टेम्पो कांदा-बटाटा पोहोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:28 AM2020-04-20T10:28:49+5:302020-04-20T10:29:35+5:30

जामखेड - कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा 'मदतीचा हात' पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्हीही तालुक्यातील तब्बल १५ हजार कुटुंबांना पुरेल एवढा ४ टेम्पो कांदा-बटाटा (दि.१९ रोजी) पोहोच करण्यात आला आहे. यामध्ये २ ट्रक कर्जत साठी व २ ट्रक जामखेडसाठी आहे. एकंदर दहा हजार किलो बटाटा व दहा किलो कांदा मतदारसंघात पाठवला आहे. 

MLA Rohit Pawar's help for Karjat-Jamkhed | आमदार रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा 'मदतीचा हात, ४ टेम्पो कांदा-बटाटा पोहोच

आमदार रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा 'मदतीचा हात, ४ टेम्पो कांदा-बटाटा पोहोच

जामखेड - कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा 'मदतीचा हात' पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्हीही तालुक्यातील तब्बल १५ हजार कुटुंबांना पुरेल एवढा ४ टेम्पो कांदा-बटाटा (दि.१९ रोजी) पोहोच करण्यात आला आहे. यामध्ये २ ट्रक कर्जत साठी व २ ट्रक जामखेडसाठी आहे. एकंदर दहा हजार किलो बटाटा व दहा किलो कांदा मतदारसंघात पाठवला आहे. 

मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमीहीन मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलोग्रॅम कांदा व एक किलोग्रॅम बटाटा तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गरजुंना पोहोच करण्यात येणार आहे. हे वाटप करत असताना सोशल डिस्टंस पाळला जावा, गर्दी होऊ नये, कसल्याही प्रकारचा दिखावा होऊ नये म्हणुन ही मदत प्रशासनाच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या मदतकार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

मागील आठवड्यातही आमदार रोहित पवार यांनी आपल्या दात्रुत्वातुन मतदारसंघात सुमारे पाच टेम्पो गहू आणि डाळ असे धान्य पोहोच करून गरीब कुटुंबाची काही दिवसांची भुक भागवली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दि.३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे गोर-गरीब कुटुंबांना,मोलमजुरांना आ.पवार यांनी मदतीचा हात दिला आहे.संकटकाळात मतदारसंघातील कुणावरही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये यासाठी विशेष 'वॉच' ठेवणाऱ्या आ.पवारांनी  आरोग्याबाबत देखील काळजी घेत मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण राज्यभर सॅनीटायझरचे वाटप करून त्यांनी सुरू केलेल्या 'कोरोनाशी लढुना' या मोहिमेत आपले मोलाचे योगदान देऊन राज्यशासनालाही हातभार  लावला आहे. तसेच शहरातील खाजगी विविध तज्ञ डॉक्टरांना रात्री ९ ते १० वाजता नागरिकांनी फोन करून सल्ला घेऊ शकतात अशी व्यवस्था आ. रोहीत पवार यांनी केली आहे. 

  ---

भुमीपुत्रांनी मदतकार्यात योगदान द्यावे-आवाहन

आपल्या कर्जत-जामखेडच्या भुमीत जन्म घेतलेल्या परंतु व्यवसायानिमित्त,नोकरीनिमित्त बाहेर आहेत.काही चांगल्या पदावर अधिकारी आहेत अशा भुमीपुत्रांनी मदतकार्यात आपले योगदान द्यावे.आणि प्रशासनाकडे आपणास जमेल ती मदत सुपूर्द करून मदतकार्य करावे.आता ही वेळ एकमेकांना मदत करून खरा मानवधर्म निभावण्याची आहे.असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

---------------------

फोटो - आ. रोहीत पवार यांनी जामखेड तहसील कार्यालयात पाच हजार किलो बटाटे व पाच हजार किलो कांदा पाठवला आहे.

Web Title: MLA Rohit Pawar's help for Karjat-Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.