आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:59 IST2018-04-18T19:53:50+5:302018-04-18T19:59:41+5:30
शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीत
अहमदनगर: शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
अटक केल्यापासून जगताप हे ११ दिवस पोलीस कोठडीत होते. त्यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर व भानुदास महादेव कोतकर यांना न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात अटक केलेला मारेकरी संदिप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांची गुरूवारी पोलीस कोठडी संपणार आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप, संदिप गुंजाळसह सात जण पोलीसांच्या ताब्यात आहेत़ पोलीस कोठडीत गुंजाळ याने दिलेल्या जबाबावरून पोलीसांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात अटक केलेले संदिप गि-हे व महावीर मोकळे यांच्याकडून पोलीसांना अपेक्षित माहिती मिळत नाही. गुन्ह्यात नाव असलेले विशाल कोतकर व रवी खोल्लम यांना पकडल्यानंतरच या गुन्ह्याचा कट कुणी रचला हे समोर येणार आहे. पोलीस पथक या दोघांचा सर्वत्र शोध घेत आहे.