रस्त्यावरून आमदार-महापौर आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:17 PM2017-09-07T22:17:43+5:302017-09-07T22:17:43+5:30
अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.
अ हमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक ते चांदणी चौक ते नगर कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, रुंदीकरण आणि जलनिस्सारण व्यवस्था याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार करून नगरसचिवांकडे दिला होता. मात्र या प्रस्तावावर आठ महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्यासाठी निधी नसल्याने सदरचा रस्ता जिल्हा नियोजनमधून करण्याबाबतचे पत्र आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले. त्यांनी सदरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव पुन्हा सादर करण्याबाबत दोनवेळा महापालिकेला पत्रव्यवहार केला. मात्र महापौरांनी जाणीवपूर्वक त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत आ. संग्राम जगताप यांनी गुरुवारचे आंदोलन निश्चित केले होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री महापौरांनी सभेची तारीख निश्चित करून रस्त्याचा विषय मंजुरीसाठी घेतला. मात्र कोणतीही लेखी माहिती प्राप्त नसल्याने पूर्व नियोजनाप्रमाणे आंदोलन केल्याचे आ. जगताप यांनी सांगत महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी त्यांनी सत्ताधाºयांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणांनी परिसर दणाणला.