नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:03 PM2020-11-21T12:03:39+5:302020-11-21T12:04:14+5:30
नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएसआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर : नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएसआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, दीपक दांगट, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश पवार, अनिकेत जाधव, शुभम साबळे, आकाश कोराळ, मोहन जाधव, राहुल कांबळे, भरत माळवदे, प्रकाश जाधव, आकाश कोलघळ आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
आंदोलनानंतर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीबाबत सकारात्मकाता दाखवत येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.