ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:42+5:302021-07-07T04:25:42+5:30
टॅब, इंटरनेटचा पालकांवर भार ८८० लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : सलग दुसऱ्या वर्षी शाळा नियमित न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ...
टॅब, इंटरनेटचा पालकांवर भार
८८०
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : सलग दुसऱ्या वर्षी शाळा नियमित न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या कुटुंबीयांचा शिक्षणावर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होत आहे.
नगर जिल्ह्यात आदर्शगाव हिवरेबाजार वगळता अन्य कुठेही नियमित शाळा भरू शकलेल्या नाहीत. शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंत शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती तर त्यापुढील शिक्षकांसाठी शंभर टक्के उपस्थितीचे आदेश बजावले आहेत. मात्र अध्यापनाचा मुख्य भर हा ऑनलाईन अध्यापनावरच असणार आहे. पालक वर्गाची मात्र त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. ऑनलाईन शिक्षण म्हटले की, सर्वप्रथम मोबाईल, टॅब, लॅपटॉपची खरेदी करावी लागली. नियमित इंटरनेटचा खर्चही आला. दोन पाल्यांसाठी दोन मोबाईलच्या खरेदीचा भार पडला. म्हणजेच प्रत्येक पालकाचा साधारणपणे ५० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.
------
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली ६८,७१६
दुसरी ७४,८९६
तिसरी ७८,४५१
चौथी ८०,४४९
पाचवी ७९,६०५
सहावी ७९,७१६
सातवी ७९,७७८
आठवी ८०,०६८
नववी ८१,२००
दहावी ७३,१३९
अकरावी ६३,८२२
बारावी ६४,१२३
--------
एकूण - ९,०६,०३३
------------
मी मुलाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी १५ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केला. मात्र मुलगा सतत चिडचिड करतो आहे. त्यातच त्याने मोबाईल जमिनीवर फेकून दिला. खर्च तर वाया गेला. ऑनलाईन शिक्षणातून विशेष फायदा होताना दिसत नाही. मुले मोबाईलचा स्पीकर व व्हिडिओ बंद करून ठेवतात. बऱ्याचदा लक्षही देत नाहीत.
-प्रशांत पांडे, पालक, श्रीरामपूर.
------------
ऑनलाईन शिक्षणाचे मुलांवर शारीरिक व मानसिक परिणाम दिसून येत आहेत. मनुष्य हा मुळातच सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे जास्त दिवस शाळा बंद ठेवणे याचे खूप दीर्घकालीन वाईट परिणाम जाणवतील. विशेषत: मुलांचा शारीरिक व्यायाम बंद झालेला आहे. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही. मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
-डॉ. भूषण देव, बालरोग तज्ज्ञ, श्रीरामपूर.
------------