लक्ष्मीबाई पाटील शाळेत मोबाइल ऑप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:50+5:302021-08-23T04:23:50+5:30
अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी ...
अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाइल ॲपचा शुभारंभ माजी आमदार तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादा कळमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कळमकर यांच्या हस्ते उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक प्रकाश भागानगरे, बापूसाहेब ओव्हळ, रयतचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अशोक बाबर, माजी लेखापरीक्षक विश्वास काळे, उत्तर विभाग निरीक्षक टी. पी. कन्हेरकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, राजनारायण पांडुळे, अनुसंगम शिंदे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी दादा कळमकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात स्मार्ट शिक्षण पध्दतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होऊन जग व्हर्च्युअल झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणपध्दती रुजली गेली. मात्र ऑनलाइन शिक्षण देताना ते अधिक दर्जेदार व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने विकसित केलेला मोबाइल ॲप विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शक ठरणार आहे. प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी ॲपबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदीप पालवे यांनी केले.
--
फोटो-२२लक्ष्मी बाई शाळा
कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाइल ॲपचा प्रारंभ करताना दादा कळमकर. समवेत गणेश भोसले, अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्ञानदेव पांडुळे, अशोक बाबर आदी.