दीपक सावंतला मोक्का लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:42+5:302020-12-22T04:19:42+5:30
अहमदनगर : निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. ...
अहमदनगर : निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. तसेच यातील आरोपी दीपक सावंत याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाईची मागणी करण्यात आली. त्यासाठी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
या आंदोलनात दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफिक शेख, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे, नागेश वायदंडे, रंगनाथ वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, रवींद्र भालेकर, दत्तात्रय बोरुडे, अविनाश लोंढे, बी. एस. विटेकर, बंडू पाटोळे, नामदेवराव चांदणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. निर्मलनगर येथील मागासवर्गीय समाजातील ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून दीपक सावंत त्रास देत आहे. गत आठवड्यात ठोकळ कुटुंबीयांना सावंत व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी मारहाण करून घराचे नुकसान केले. तसेच गाड्या जाळण्यात आल्या. सावंत याला पोलिसांनी अटक केली असून आता त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
--
फोटो- २१ दलित महासंघ
निर्मलनगर येथील ठोकळ कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या दीपक सावंतला मोक्का लावण्याची दलित महासंघाने मागणी केली आहे. निदर्शने करताना पदाधिकारी.
निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबीयांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून निदर्शने करताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफीक शेख, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे, नागेश वायदंडे, रंगनाथ वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, रवींद्र भालेकर, दत्तात्रय बोरुडे, अविनाश लोंढे, बी.एस. विटेकर, बंडू पाटोळे, नामदेवराव चांदणे आदी. (छाया-साजिद शेख-नगर)