मोदी सरकार नापास - अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:58 AM2018-05-28T04:58:26+5:302018-05-28T04:58:50+5:30
शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने तक्काळ करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) - शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने तक्काळ करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. त्यासाठी गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी येथे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
अण्णांनी मोदी सरकारच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना शनिवारी पत्र पाठविले. मोदींनी निवडणुकीत देशात लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी तत्काळ करू. भ्रष्टाचाराला आळा घालू, असे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला चार वर्षे पूर्ण होत असून, त्यापैकी एकाही आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. देशातील भ्रष्टाचारही कमी झालेला नाही, असे अण्णांनी म्हटले आहे. २३ मार्चला शहीद दिनापासून रामलीला मैदानावर सात दिवस उपोषण केले होते.