सुधारित- डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:14+5:302021-05-24T04:20:14+5:30
संसर्गाचे निदान करण्यासाठी 1) रॅपिड अँटिजन टेस्ट (आरएटी) सेन्सिटिव्हिटी ४० टक्के. तपासणी पॉझिटिव्ह असल्यास संसर्ग आहे. तपासणी निगेटिव्ह ...
संसर्गाचे निदान करण्यासाठी
1) रॅपिड अँटिजन टेस्ट (आरएटी) सेन्सिटिव्हिटी ४० टक्के. तपासणी पॉझिटिव्ह असल्यास संसर्ग आहे. तपासणी निगेटिव्ह आल्यास व लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे.
2) आरटी- पीसीआर सेन्सिटिव्हिटी ९० टक्के. जास्त संवेदनशील तपासणी; परंतु रिपोर्ट येण्यास एक दिवसाचा अवधी लागू शकतो.
3) कोविड अँटीबॉडी टेस्ट :
या तपासणीमध्ये कोविड संसर्ग होऊन गेल्यानंतर /लसीकरण झाल्यानंतर प्रतिपिंडे किती तयार झाली ते मोजतात. लहान मुलांमधील "एमआयएस- सी" या आजाराचे निदान करण्यासही उपयोगी पडते.
कोविड संसर्गाची तीव्रता किती आहे हे सांगणाऱ्या तपासण्या
1) एचआरसीटी (छातीचा सिटी स्कॅन ) :
०-२५ स्कोअर यात दिला जातो. त्यावरून फुफ्फुसाचा किती भाग बाधित आहे हे समजते.
2) छातीचा एक्स-रे : लहान मुलांमध्ये एक्स-रे जास्त उपयोगी.
3) रक्तातील तपासण्या