गीता संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल-मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:01 PM2019-12-08T18:01:32+5:302019-12-08T18:02:15+5:30
गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. फळाचे अपेक्षा करु नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.
संगमनेर : गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. फळाचे अपेक्षा करु नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.
संगमनेर येथे गीता महोत्सवाला रविवारी दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लक्षणीय होती. गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेर येथे ७१ हजार गीतेचे मुखोद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्त गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी या गीता महोत्सवाचे नियोजन केले आहे. या महोत्सवात विविध ठिकाणाहून येणारे ८ राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रविवारी सकाळपासून गीता महोत्सवात शौर्य प्रात्यक्षिक, योग प्रात्याक्षिक, नृत्य सादरीकरणाने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते.