साईसंस्थांनचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 08:07 AM2020-09-26T08:07:49+5:302020-09-26T08:08:31+5:30
शिर्डी: साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे.
शिर्डी: साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरा पासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते, काल त्यांची तब्बेत ढासळल्या नंतर त्यांच्या वर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के व्ही रमणी यांनी संस्थानला 110 कोटीच्या देणगीतून साईआश्रम इमारत बांधून दिली, त्यातील काही इमारतीत आज कोविड हॉस्पिटल सुरू आहे, यादव यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या.
यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा जवळपास बारा भाषेत अनुवाद झालेला आहे.
यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.