नगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:01 PM2018-09-21T13:01:52+5:302018-09-21T13:49:42+5:30
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिकआणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला.
अहमदनगर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिकआणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला आज दुपारी शहरातील कोठला व मंगलगेट हवेली येथून प्रारंभ झाला.
या हुसेन, या हुसेन अशा घोषणा...सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. ताबूत सवारी सोबत आणि मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
कोठला येथून छोटे इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोठला परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. मंगलगेट हवेली येथून दुपारनंतर मोठे इमाम हसन यांची सवारी मार्गस्थ होणार आहे़ दरम्यान काल रात्री कत्तलची रात्रची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते़ मोहरम ताबूत मिरवणूक सायंकाळी सात पर्यंत दिल्लीगेटच्या बाहेर काढण्याचे पोलीसांनी उदिष्ट ठेवले आहे. मिरवणुकीत अधिकाऱ्यांसह १२०० पोलीसबळ तैनात करण्यात आले आहे.
असा आहे मिरवणूक मार्ग
कोठला- फलटण पोलीस चौकी- मंगलगेट हवेली- आडते बाजार-पिंजार गल्ली- पारशा खुंट- जुना कापड बाजार- देवेंद्र हॉटेल - खिस्त गल्ली- पंचपीर चावडी- जुनी महानगरपालिका- कोर्टाची मागील बाजू - चौपाटी कारंजा- दिल्लीगेट- निलक्रांती चौक-बालिकाश्रम रोड- सावेडी गांव