कोपरगावातील गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:11 PM2018-05-12T16:11:07+5:302018-05-12T16:16:11+5:30

कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे.

Moka with Kopargaon gangster Kiran Hazare on your side | कोपरगावातील गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

कोपरगावातील गुंड किरण हजारेसह तेरा जणांवर मोक्का

ठळक मुद्दे संघटित गुन्हेगारीखुनाचा प्रयत्न, दरोडा, वाळूतस्करी, फसवणुकीसह अनेक गुन्हे

अहमदनगर: कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. हजारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरवडा, जबरी चोरी, फसवणूक, मारहाण, वाळूतस्करी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोपरगाव तालुका पोलीसांनी हजारे टोळीविरोधात मोक्कातंर्गत कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे मंजूरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. हजारे व त्याच्या साथीदारांवर कोपरगाव शहर, ग्रामीण, शिर्डी, शिरूर, कोतवाली आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तेरा गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील २० गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मागील आठवड्यात राहुरी येथील वाळूतस्करांची टोळी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे.

या तेरा जणांना लागला मोक्का
किरण माधव हजारे (वय ३३ रा़ कोकमठाण ता़ कोपरगाव), अक्षय रमेश बारसे (वय २२ रा़ वारी), गणेश माधव हजारे (वय २६ रा़ कोकमठाण,) जयदेव उर्फ जालींदर कारभारी खंडीझोड (वय ४५ रा़ वेस ता़ कोपरगाव),योगेश सुखदेव भड (२८), सुरज प्रकाश ठाकूर (वय २६ रा़ शिर्डी), प्रदिप सर्जेराव जायभाये (वय २४ रा़ नाशिक), देवा उर्फ देवानंद जयदेव उर्फ जालिंदर खंडीझोड (रा़ पोहेगाव), सागर भिमराव धोत्रे, अजय विनायक माहिरे, रवी रामा मोरे, प्रतिक ज्ञानदेव गोंदकर, अनंत सर्जेराव जायभाये (रा़ नाशिक)

हजारेसह पाच जण अटकेत
दरोड्याच्या गुन्ह्यात किरण हजारे याच्यासह त्याच्याच्या पाच साथीदारांना दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव पोलीसांनी अटक केली आहे. त्याचे उर्वरित साथीदार फरार असून, पोलीसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. हजारे याच्या टोळीची कोपरगाव तालुका व परिसरात मोठी दहशत आहे. 

 

Web Title: Moka with Kopargaon gangster Kiran Hazare on your side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.